

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे आज सायंकाळी 60 वर्षे वयाच्या आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी (ता. १६) पॉझिटिव्ह आलेल्या त्या युवकाचा हा मामा आहे. कुंडलवाडी येथे रुग्णांची संख्या दोन झाली आहे. तर त्याच्या कुटुंबातील अन्य तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मुंबईहून कुंडलवाडी येथे आलेल्या त्या ३० वर्षीय तरुणाची येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करण्यात आली होती. त्याला लक्षणे आढळल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या पाठोपाठ त्याच्या कुटुंबातील त्याच्या मामांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. सुदैवाने त्याच्या कुटुंबातील अन्य तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी तो युवक पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुका प्रशासनाने त्या रात्रीच तातडीने सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सध्या त्या तरुणावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याच्या मामांनाही आज उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. हे कुटुंब ज्या भागात राहात आहे, तो भाग कंटेन्मेंट करण्यात आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील म्हणाले, ‘कुंडलवाडी येथील अन्य तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कापूसखेड येथील मुंबईहून आलेल्या एकाला लक्षणे आढळल्याने त्याला मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य एकाला इस्लामपूर येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबातील सात जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वाळवा तालुक्यातील 14 इतक्या लोकांना सध्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये कुंडलवाडी, कामेरी, कासेगाव, जांभूळवाडी, कापुसखेड व इटकरे येथील लोकांचा समावेश आहे. तर 1 हजार 793 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुणे, मुंबई शहरातून तसेच इतर जिल्ह्यांतून वाळवा तालुक्यात आलेल्या लोकांचा मोठा धोका लक्षात घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दीड महिन्यात 14 हजार 400 लोक बाहेरून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.